मराठी  |   English

७८८७८८२०२६

vanarti.info@gmail.com

1200px-Emblem_of_India.svg-603x1024
Logo

वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था

(वनार्टी)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )
CIN: U84120MH2026NPL466492

Punyashlok_300_Logo

कर्मचारी निवड आयोग परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण (SSC-CGL)

  • प्रशिक्षणाचे स्वरूप : विविध शैक्षणिक संस्थांमार्फत घेण्यात येणाऱ्या Staff Selection Commission Combined Graduate Level (SSC-CGL) परीक्षेचे 6 महिने प्रशिक्षण हे नामांकित संस्थांमध्ये देण्यात येते. 
  •  लाभाचे स्वरूप : 
  1. मोफत प्रशिक्षण 
  2. विद्यावेतन: दरमाह 75% हजेरी असल्यास रु. 10,000/- 
  3. आकस्मिक निधी : एकवेळ रु. 12,000/- 
  •  पात्रता निकष : 
  1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच विमुक्त जाती-अ (VJ-A) , भटक्या जमाती – ब, क, ड (NT-B, NT-C, NT-D) प्रवर्गातील असावा. 
  2. उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर गटातील असावा. 
  3. उमेदवाराने पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. 
  •  अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : 
  1. ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड 
  2. जात प्रमाणपत्र 
  3. वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
  4. आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे 
  •  प्रशिक्षणासाठी निवड पद्धतीः 
  1. प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन वनार्टीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात. 
  2. प्राप्त अर्जाची छाननी करून, विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची मिरीट व प्रवर्ग निहाय आरक्षणानुसार अंतिम निवड करण्यात येते.