प्रशिक्षणाचे स्वरूप : महाराष्ट्र पोलीस दल व केंद्रीय पोलीस सेवा यांचेमार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस भरती परीक्षेचे 6 महिने प्रशिक्षण हे नामांकित संस्थांमध्ये देण्यात येते.
लाभाचे स्वरूप :
मोफत प्रशिक्षण
विद्यावेतनः दरमाह 75% हजेरी असल्यास 10,000/-
आकस्मिक निधी : एकवेळ रु. 12,000/-
पात्रता निकष :
उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच विमुक्त जाती-अ (VJ-A) , भटक्या जमाती – ब, क, ड (NT-B, NT-C, NT-D) प्रवर्गातील असावा.
उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
उमेदवाराने 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
वयाची अट: 18 ते 33 वर्षे.
किमान उंची 157 से.मी. (पुरुषांकरिता), 152 से.मी. (महीलांकरिता)
छाती (फक्त पुरुषांकरिता) : किमान 77 से.मी. व दीर्घश्वास घेतल्यावर 82 से.मी.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
जात प्रमाणपत्र
वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
प्रशिक्षणासाठी निवड पद्धतीः
प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन वनार्टीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
प्राप्त अर्जाची छाननी करून, विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची मिरीट व प्रवर्ग निहाय आरक्षणानुसार अंतिम निवड करण्यात येते.