1200px-Emblem_of_India.svg-603x1024
Logo

VASANTRAO NAIK RESEARCH & TRAINING INSTITUTE

(VANARTI)

(An Autonomous Institute of The Other Backward Class Bahujan Welfare Department, Govt. of Maharashtra)
CIN: U84120MH2026NPL466492

Punyashlok_300_Logo

Pre-Examination Training for Military

    • प्रशिक्षणाचे स्वरूप : भारतीय सैन्य दल, केंद्रीय पोलीस सेवा यांचेमार्फत घेण्यात येणाऱ्या मिलिटरी भरती परीक्षेचे ६ महिने प्रशिक्षण हे नामांकित संस्थांमध्ये देण्यात येते. 
  • लाभाचे स्वरूप :
  1. मोफत प्रशिक्षण 
  2. विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१०,०००/- 
  3. आकस्मिक निधी : एकवेळ रु.१२,०००/-
  • पात्रता निकष :
  1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच विमुक्त जाती-भटक्या जमाती प्रवर्गातील असावा. 
  2. उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
  3. उमेदवाराने १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
  4. वयोमर्यादा : १७ ते १९ वर्षे.
  5. किमान उंची १५७ से.मी. (पुरुषांकरिता), १५२ से.मी. (महिलांकरिता), 
  6. छाती (फक्त पुरुषांकरिता): किमान ७७ से.मी. व दीर्घश्वास घेतल्यावर ८२ से.मी. 
  • अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : 
  1. ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड  
  2. जात प्रमाणपत्र 
  3. वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र 
  4. आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे 
  • प्रशिक्षणासाठी निवड पद्धती: 
  1. प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन वनार्टीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात. 
  2. विद्यार्थ्यांची निवड परीक्षा घेऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची मिरीट व प्रवर्ग निहाय आरक्षणानुसार अंतिम निवड करण्यात येते.