प्रशिक्षणाचे स्वरूप : अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात प्रवेश मिळण्यासाठी १८ महिने JEE/NEET/MHT-CET चे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येते.
लाभाचे स्वरूप :
मोफत प्रशिक्षण
विद्यार्थ्यांना मोफत Tablet
प्रतिदिवस ६ जीबी इंटरनेट सेवा
पात्रता निकष :
उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमी लेअर गटातील असावा.
उमेदवाराने १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे शहरी भागातील विद्यार्थ्यांना किमान ७०% टक्के गुण असावेत तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना किमान ६०% टक्के गुण असावेत.
विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
जात प्रमाणपत्र
वैध नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र
आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
प्राप्त अर्जांची छाननी करून १० ला प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे व संवर्गनिहाय तसेच समांतर आरक्षणानुसार उमेदवारांची निवड करण्यात येते