वनार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती
- प्रशिक्षणाचे स्वरूप : संघ लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेतील पूर्व, मुख्य व व्यक्तिमत्व चाचणीचे ११ महिने प्रशिक्षण हे दिल्ली व महाराष्ट्र येथील नामांकित संस्थांमध्ये देण्यात येते.
- लाभाचे स्वरूप :
- मोफत प्रशिक्षण
- आकस्मिक निधी : एकवेळ रु.१८,०००/-
- विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१3,०००/- विद्यावेतन
- प्रवास खर्च : दिल्ली येथील प्रशिक्षणाकरिता रु.१०,०००/-
- पात्रता निकष :
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
- उमेदवाराने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
- वयाची अट : २१ ते ३3 वर्षे , दिव्यांगाकरिता : ३5 वर्षे
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
- जात प्रमाणपत्र
- वैध नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
- प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन वनार्टीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
- प्राप्त अर्जांची छाननी करून उमेदवारांची निवड परीक्षा घेण्यात येते.
- निवड परीक्षेमध्ये प्राप्त गुणांकानुसार व सामाजिक प्रवर्ग टक्केवारी नुसार उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येते.
- प्रशिक्षणाचे स्वरूप : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेतील पूर्व, मुख्य व व्यक्तिमत्व चाचणीचे ११ महिने प्रशिक्षण नामांकित संस्थांमध्ये देण्यात येते.
लाभाचे स्वरूप :
- मोफत प्रशिक्षण
- विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१०,०००/-
- आकस्मिक निधी : एकवेळ रु.१२,०००/-
पात्रता निकष :
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा.
- उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
- उमेदवाराने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
- वयाची अट : १९ ते ४३ वर्षे , दिव्यांगाकरिता : ४५ वर्षे
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
- जात प्रमाणपत्र
- वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
- प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन वनार्टीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
- प्राप्त अर्जांची छाननी करून उमेदवारांची निवड परीक्षा घेण्यात येऊन अंतिम निवड करण्यात येते.
- प्रशिक्षणाचे स्वरूप : विविध शैक्षणिक संस्थांमार्फत घेण्यात येणाऱ्या MBA-CAT, CET परीक्षेचे ६ महिने प्रशिक्षण हे पुणे येथील नामांकित संस्थांमध्ये देण्यात येते.
- लाभाचे स्वरूप :
- मोफत प्रशिक्षण
- विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१०,०००/-
- आकस्मिक निधी : एकवेळ रु.१२,०००/-
- पात्रता निकष :
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमी लेअर गटातील असावा.
- उमेदवाराने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
- जात प्रमाणपत्र
- वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
- प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन वनार्टीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
- प्राप्त अर्जांची छाननी करून उमेदवारांची निवड परीक्षा घेण्यात येऊन अंतिम निवड करण्यात येते.
- निवड परीक्षेमध्ये प्राप्त गुणांकानुसार व सामाजिक प्रवर्ग टक्केवारी नुसार उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येते.
- प्रशिक्षणाचे स्वरूप : भारतीय सैन्य दल, केंद्रीय पोलीस सेवा यांचेमार्फत घेण्यात येणाऱ्या मिलिटरी भरती परीक्षेचे ६ महिने प्रशिक्षण हे पुणे येथील नामांकित संस्थांमध्ये देण्यात येते.
- लाभाचे स्वरूप :
- मोफत प्रशिक्षण
- विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१०,०००/-
- आकस्मिक निधी : एकवेळ रु.१२,०००/-
- पात्रता निकष :
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमी लेअर गटातील असावा.
- उमेदवाराने 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
- किमान उंची १५७ से.मी. (पुरुषांकरिता), १५२ से.मी. (महिलांकरिता),
- छाती (फक्त पुरुषांकरिता): किमान ७७ से.मी. व दीर्घश्वास घेतल्यावर ८२ से.मी.
- वयाची अट : १७ ते 1९ वर्षे
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
- जात प्रमाणपत्र
- वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
- प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
- प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन वनार्टीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
- प्राप्त अर्जांची छाननी करून उमेदवारांची निवड परीक्षा घेण्यात येते.
निवड परीक्षेमध्ये प्राप्त गुणांकानुसार व सामाजिक प्रवर्ग टक्केवारी नुसार उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येते.
- प्रशिक्षणाचे स्वरूप : अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात प्रवेश मिळण्यासाठी १८ महिने JEE/NEET/MHT-CET चे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येते.
- लाभाचे स्वरूप :
- मोफत प्रशिक्षण
- विद्यार्थ्यांना मोफत Tablet
- प्रतिदिवस ६ जीबी इंटरनेट सेवा
- पात्रता निकष :
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमी लेअर गटातील असावा.
- उमेदवाराने १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे शहरी भागातील विद्यार्थ्यांना किमान ७०% टक्के गुण असावेत तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना किमान ६०% टक्के गुण असावेत.
- विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
- जात प्रमाणपत्र
- वैध नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
- प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन वनार्टीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
प्राप्त अर्जांची छाननी करून १०वी ला प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे व संवर्गनिहाय तसेच समांतर आरक्षणानुसार उमेदवारांची निवड करण्यात येते
- प्रशिक्षणाचे स्वरूप : राष्ट्रीय कौशल्य विकास कॉर्पोरेशनने (NSDC) निश्चित केलेल्या निकषानुसार सेक्टर स्कील कौन्सिल, शासकीय प्रशिक्षण संस्था तसेच खाजगी प्रशिक्षण संस्था यांचे मार्फत विविध तांत्रिक तसेच सेवा क्षेत्रातील २ ते १२ महिन्यापर्यंतचे कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येते.
- लाभाचे स्वरूप :
- मोफत प्रशिक्षण
- निवासी प्रशिक्षण असल्यास निवास व भोजनाची मोफत व्यवस्था.
- प्रशिक्षणानंतर खाजगी कंपन्या तसेच आस्थापनांमध्ये रोजगाराची संधी.
- पात्रता निकष :
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमी लेअर गटातील असावा.
- उमेदवाराला ज्या अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावयाचा आहे अश्या अभ्यासक्रमांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असावी.
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
- जात प्रमाणपत्र
- वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
| अ क्र | योजनेचे नाव | अर्थसहाय्य रक्कम | पात्रता निकष |
| १ | UPSC नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणीपरीक्षेसाठी अर्थसहाय्य | रु.२५,०००/- एकवेळ | उमेदवार हा UPSC नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणीकरिता पात्र असावा. |
| २ | UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षेसाठी अर्थसहाय्य | रु.५०,०००/- एकवेळ | उमेदवार हा UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा. |
| ३ | UPSC वनसेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी अर्थसहाय्य | रु.२५,०००/- एकवेळ | उमेदवार हा UPSC वनसेवा व्यक्तिमत्व चाचणीकरिता पात्र असावा. |
| ४ | UPSC वनसेवा मुख्य परीक्षेसाठी अर्थसहाय्य | रु.५०,०००/- एकवेळ | उमेदवार हा UPSC वनसेवा मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा. |
| ५ | MPSC राज्यसेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी अर्थसहाय्य | रु.10000/- एकवेळ | उमेदवार हा MPSC राज्यसेवा व्यक्तिमत्व चाचणी करिता पात्र असावा. |
| ६ | MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी अर्थसहाय्य | रु.१५,०००/- एकवेळ | उमेदवार हा MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा. |
| ७ | MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षाअर्थसहाय्य | रु.१०,०००/- एकवेळ | उमेदवार हा MPSC दुय्यम सेवा मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा. |
| ८ | MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा मुलाखत अर्थसहाय्य | रु.५,०००/- एकवेळ | उमेदवार हा MPSC दुय्यम सेवा मुलाखत परीक्षेकरिता पात्र असावा. |
| १५ | MPSC मुलाखत परीक्षा अर्थसहाय्य | रु.१५,०००/- एकवेळ | उमेदवार हा MPSC मुलाखत परीक्षेकरिता पात्र असावा. |
| १७ | UPSC CAPF मुलाखत परीक्षा अर्थसहाय्य | रु.२५,०००/- एकवेळ | उमेदवार हा UPSC CAPF मुलाखतपरीक्षेकरिता पात्र असावा. |