Pre-Examination Training for State Services Examination Conducted by MPSC
प्रशिक्षणाचे स्वरूप : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेतील पूर्व, मुख्य व व्यक्तिमत्व चाचणीचे ११ महिने प्रशिक्षण हे पुणे येथील नामांकित संस्थांमध्ये देण्यात येते.
निर्धारित वार्षिक जागा : ७५०
लाभाचे स्वरूप :
मोफत प्रशिक्षण
विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१०,०००/-
आकस्मिक निधी : एकवेळ रु.१२,०००/-
पात्रता निकष :
उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा.
उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
उमेदवाराने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
वयाची अट : १९ ते ४१ वर्षे , दिव्यांगाकरिता : ४३ वर्षे
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
जात प्रमाणपत्र
वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
विद्यार्थ्यांची निवड परीक्षा घेऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची मिरीट व प्रवर्ग निहाय आरक्षणानुसार अंतिम निवड करण्यात येते.