Pre-Examination Training Staff Selection Commission Combined Graduate Level (SSC-CGL)
प्रशिक्षणाचे स्वरूप : विविध शैक्षणिक संस्थांमार्फत घेण्यात येणाऱ्या Staff Selection Commission Combined Graduate Level (SSC-CGL)परीक्षेचे ६ महिने ऑनलाईन व अनिवासी पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येते.
निर्धारित वार्षिक जागा : 500
लाभाचे स्वरूप :
मोफत प्रशिक्षण
प्रशिक्षण संस्थेमार्फत टॅबलेट व ६ जीबी डेटा (दररोज) देण्यात येते.
पात्रता निकष :
उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा.
उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
उमेदवाराने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
वयाची अट : २० ते ३० वर्षे , दिव्यांगाकरिता : ३५ वर्षे
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
जात प्रमाणपत्र
वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
विद्यार्थ्यांची निवड परीक्षा घेऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची मिरीट व प्रवर्ग निहाय आरक्षणानुसार अंतिम निवड करण्यात येते.