Pre-Examination Training for Civil Services Examination Conducted by UPSC
संघ लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण:
प्रशिक्षणाचे स्वरूप : संघ लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेतील पूर्व, मुख्य व व्यक्तिमत्व चाचणीचे ११ महिने प्रशिक्षण हे दिल्ली व महाराष्ट्र येथील नामांकित संस्थांमध्ये देण्यात येते.
निर्धारित वार्षिक जागा : १००० (दिल्ली व महाराष्ट्र)
लाभाचे स्वरूप :
मोफत प्रशिक्षण
विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१3,०००/- विद्यावेतन
आकस्मिक निधी : एकवेळ रु.१८,०००/-
दिल्ली येथील विद्यार्थ्यांकरिता प्रवास भत्ता एकवेळ रु. १०,०००/-
पात्रता निकष :
उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा.
उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
उमेदवाराने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
वयाची अट : २१ ते ३३ वर्षे , दिव्यांगाकरिता : ३५ वर्षे
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
जात प्रमाणपत्र
वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
विद्यार्थ्यांची निवड परीक्षा घेऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची मिरीट व प्रवर्ग निहाय आरक्षणानुसार अंतिम निवड करण्यात येते.